स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले:श्वेता खर्चे*

*विश्वशांती विद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*
सावली: स्त्रियांसाठी साक्षरतेची वाट प्रकाशमान करणाऱ्या, स्त्री शिक्षण तसेच समाज परिवर्तनाची दिशा आणि तत्कालीन समाज परिस्थिती यावर श्वेता खर्चे यांनी अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन केले.
भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये मोठ्या उत्साहात सावित्रीबाई फुले यांची १९३ वी जयंती साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम संपूर्ण सावली नगरातून शालेय विद्यार्थ्यांची जनजागरण रॅली काढण्यात आली.*जय ज्योती जय क्रांती* च्या जयघोषाने सावली नगरी दुमदुमली. त्यानंतर शालेय परिसरात कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या शिक्षिका श्वेता खर्चे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम,राजू केदार,राजश्री बिडवई, काजल बारापात्रे,नम्रता गुज्जनवार मंचावर उपस्थित होते.
जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्याकडून भाषणे आणि गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या संचालन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षिका प्रसन्ना अल्लुरवार यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षिका उर्मिला बारेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.