*पोलिस स्थापना दिना निमित्त सद्भावना क्रिकेट चषक*

*सावली पोलिस स्टेशनचा उपक्रम*
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमीत्याने पोलीस स्टेशन सावली च्या वतीने ‘चला एकत्र येऊया.’ या घोषवाक्याने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ जानेवारी ते ७ जानेवारी २०२४ पर्यंत हा सामना चालणार असून तालुक्यातील सर्व प्रशासन विभाग, पत्रकार संघ, सरपंच संघटना, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना अश्याप्रकारचे तालुक्यातील १६ संघ सहभागी होणार आहेत. या चषकाचे उदघाटन ४ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचे हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मुलचे उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम राहणार आहेत.
प्रमुख अतिथी उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीकार्जुन इंगळे, तालुका न्यायदंडाधिकारी अक्षय जगताप, तहसीलदार परीक्षीत पाटील, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक, नगराध्यक्ष लताताई लाकडे, वैद्यकीय अधीक्षक बंडू रामटेके, असोला मेंढा प्रकल्पचे अधीक्षक अभियंता अशोक पिदूरकर सह प्रमुख अतिथी उपस्थित राहणार आहेत. या सद्भावना क्रिकेट चषकात सहभागी होण्याचे आवाहन सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त दरवर्षी आमच्या विभागाच्या वतीने क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात येते. तालुक्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, व्यापारी यांच्यात एकतेची, आपुलकीची भावना निर्माण व्हावी आणि ती टिकून रहावी यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न आहे.
आशिष बोरकर ठाणेदार. पोलीस स्टेशन. सावली