काँग्रेस कार्यालयात सावित्रीच्या लेकीने दिल्या मानवंदना

*दिनांक :- ०३ जानेवारी २०२४*
*सावली(ता.प्र.):- देशभरात ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाणार आहे.सावित्रीबाई फुले यांनी महिला आणि मुलींना प्रेरणा दिली आहे.सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आहेत.महिला सशक्तीकरणाकरिता त्यांनी आपल संपूर्ण जीवन समर्पित केलं आहे.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत.*
*बालविवाहावर बंदी, विधवांवरील अत्याचाराला लगाम लावणे आणि महिलांच्या कल्याणाचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वतःच्या म्हणजेच स्व कर्तुत्वाने आपले समाज सुधारण्याच्या क्षेत्रामध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे.आज त्यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे जनसंपर्क कार्यालय सावली येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*
*अभिवादन करते समयी सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यलवार नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,बांधकाम सभापती सौ.साधनाताई वाढई,महिला व बाल कल्याण सभापती सौ.ज्योती शिंदे,उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल,नगरसेवक मा.सचिन संगीडवार,नगरसेविका सौ.अंजली देवगडे,सौ.ज्योती गेडाम,सौ.प्रियंका रामटेके,सौ.सीमा संतोषवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सौ.शिला गुरनुले,मा.बादल गेडाम,आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक बहुसंख्यने उपस्थित होते.*