*हिट अँड रन कायद्याविरोधात चालक – मालक संघटनेचा रास्तारोको*

हिरापुर: आंदोलन गडचिरोली-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील हीरापुर बस स्थानकाच्या ठीकानी हिट अँड रन कायद्याविरोधात आज जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना सावली तालुक्याच्या वतीने आज सकाळीच रास्ता रोको करण्यात आला.
अपघात घडल्यास मृत्यूच्या ठिकाणी सोडून पळून जाणे हे माणुसकीला पटण्यासारखे नाही, पण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडून जाणे हे नैसर्गिक क्रिया आहे, परंतु कायद्याचे कठोर संरक्षण चालकाला नसल्याने घटना ठिकाणावरून पडून जाणे हे स्वाभाविक आहे त्याकरिता चालक सुरक्षा कायद्याची सुरुवातीला अंमलबजावणी करणे आणि त्यानंतर या नवीन कायद्यामध्ये कारावासाचा कालावधी व आर्थिक दंड यामध्ये कमी करण्यात यावा यासाठी हिरापूर बस स्थानकाजवळ दोन तास रास्ता रोको करण्यात आला. सरकारने लागू केलेला ही ट्रेन कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा ही मागणी धरून रास्ता रोको करण्यात आला जर हा कायदा रद्द केल्यास येणाऱ्या दिवसात देशाचे चित्र बदललेले दिसेल. या कायद्याच्या विरोधात चालक- मालक संघटना वेगळी भूमिका घेईल आणि याला सर्वस्वी जबाबदार सरकार असेल असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.
यावेळी आंदोलनच्या ठिकाणी महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य सुधीर टोंगे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष उमेश आजबले, उपाध्यक्ष रवींद्र झरकर, तालुकाध्यक्ष राजू देशमुख, उपाध्यक्ष निलेश वद्देलवार, विजय गुरनुले, प्रज्वल कोतपल्लीवार, लीलाधर भांडेकर, शुभम लेनगुरे, रजनीकांत सोनवाणे, अरविंद सोनवाणे, हरिदास कात्तलवार, मंगेश बाबनवाडे, नितेश उरकुडे अक्षय शेंडे व शेकडो वाहन चालक मालक उपस्थित होते.